फुलबासन बाई यादव (जन्म : ५ डिसेंबर, १९६९) या एक भारतीय समाजसेविका आणि 'माँ बमलेश्वरी जनहित कारी समिती' या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक आहेत. भारतातील छत्तीसगड मधील आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्या ओळखल्या जातात. भारत सरकारने २०१२ मध्ये त्यांना चौथ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. त्या 'व्हिजन इंडिया फाउंडेशन'च्या मार्गदर्शक म्हणूनही काम पाहतात. कौन बनेगा करोडपती (सीझन १२) च्या 'कर्मवीर' विशेष भागात त्या अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्यासोबत सहभागी झाल्या होत्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फूलबासन बाई यादव
या विषयातील रहस्ये उलगडा.