फहमीदा रियाज (२३ जुलै, इ.स. १९४६:मेरठ, उत्तर प्रदेश, भारत - ) या एक पाकिस्तानी कवयित्री आहेत.
फहमीदा रियाज यांचे वडील रियाजउद्दीन अहमद हे मेरठमध्ये शिक्षणाधिकारी होते. पुढे सिंध प्रांतात बदली झाल्याने ते पाकिस्तानात स्थायिक झाले. फहमीदा चार वर्षांची असतानाच त्यांचे निधन झाले. तिच्या आई हुस्ना बेगम यानी फहमीदांचे शिक्षण चालू ठेवले. तेथेच फहमीदा सिंधी, उर्दू आणि फारसी शिकल्या.
महाविद्यालयात असताना फहमीदा युनिव्हर्सिटी ऑर्डिनन्स व स्टुडन्ट युनियन ट्रस्टच्या बंदीविरुद्ध लिखाण करू लागल्या, भाषणे देऊ लागल्या. त्यानंतर त्यांची ओळख कार्यकर्ती व बंडखोर प्रगतीशील स्त्रीवादी लेखिका म्हणून झाली.
कॉलेज शिक्षण पूर्ण झाल्यावर फहमीदा पाकिस्तान रेडियोवर निवेदक म्हणून काम करू लागल्या.
फहमीदा रियाज
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.