झुल्फिकार अली भुट्टो (सिंधी: ذوالفقار علي ڀُٽو ; उर्दू: ذوالفقار علی بھٹو ; रोमन लिपी: Zulfikar Ali Bhutto ;) (जानेवारी ५, इ.स. १९२८ - एप्रिल ४, इ.स. १९७९) हा पाकिस्तानी राजकारणी होता. तो २० डिसेंबर, इ.स. १९७१ ते १३ ऑगस्ट इ.स. १९७३ या कालखंडात पाकिस्तानाचा चौथा पंतप्रधान म्हणून, तर १४ ऑगस्ट, इ.स. १९७३ ते ५ जुलै, इ.स. १९७७ या कालखंडात पाकिस्तानाचा नववा पंतप्रधान म्हणून अधिकारारूढ होता. पाकिस्तान पीपल्स पार्टी या पाकिस्तानातील राजकीय पक्षाचा तो संस्थापक होता. त्याची कन्या बेनझीर भुट्टो हीदेखील दोनदा पाकिस्तानाची पंतप्रधान होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झुल्फिकार अली भुट्टो
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.