प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर (फ्रेंच: Provence-Alpes-Côte d'Azur; ऑक्सितान: Provença-Aups-Còsta d'Azur / Prouvènço-Aup-Costo d'Azur) हा फ्रान्स देशाच्या २७ प्रदेशांपैकी एक आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या दक्षिण भागात स्थित असून त्याच्या दक्षिणेला भूमध्य समुद्र व मोनॅको तर पूर्वेला इटली हे देश आहेत.
प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर हा प्रदेश खालील भूभागांचा बनला आहे.
भूतपूर्व प्रांत प्रोव्हॉंस
आव्हियों हे पोपचे स्थान
फ्रेंच आल्प्स प्रदेश
नीस व फ्रेंच रिव्हिएरा हा फ्रान्सचा भूमध्य समुद्रकिनारा
लोकसंख्या व अर्थव्यवस्था ह्या दोन्ही बाबतीत प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशाचा फ्रान्समध्ये तिसरा क्रमांक लागतो (इल-दा-फ्रान्स व रोन-आल्प खालोखाल).
प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.