प्रा. प्रवीण दवणे ( ६ एप्रिल १९५९) हे मराठी लेखक, गीतकार, पटकथालेखक आहेत. ते ’ज्ञानसाधना महाविद्यालया’त प्राध्यापक होते तेथून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पूर्णवेळ लेखनाकडे वळले.
प्रवीण दवणे हे ठाणे शहराचे रहिवासी आहेत. त्यांनी २०००हून अधिक गीते लिहिली आहेत, आणि ती लता मंगेशकर, आशा भोसले,पंडित जितेंद्र अभिषेकी, सुमन कल्याणपूर,सुलोचना चव्हाण, श्रीधर फडके,साधना सरगम, सुरेश वाडकर, शंकर महादेवन अशा अनेक दिग्गज गायकांनी गायली आहेत.
प्रवीण दवणे उत्तम वक्ते आहेत. ‘दिलखुलास’, ‘सावर रे!’ ' वय वादळ विजांचं', ' माझ्या लेखनाची आनंदयात्रा ' हे त्यांचे कार्यक्रम विशेष गाजले असून त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
प्रवीण दवणे यांची आजपर्यंत ११०हून अधिक पुस्तके व कविता संग्रह प्रकाशित केले आहेत.
प्रवीण अनंत दवणे
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!