प्रवती परिदा (जन्म १९६७) ह्या ओडिशातील राजकारणी आहे. २०२४ मध्ये त्या ओडिशाच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या. त्या महिला आणि बाल विकास, मिशन शक्ती आणि पर्यटन मंत्री देखील आहेत. पुरी जिल्ह्यातील निमापारा विधानसभा मतदारसंघातील त्या भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रवती परिदा
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.