कनक वर्धन सिंह देव

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

कनक वर्धन सिंह देव

कनक वर्धन सिंह देव (जन्म १४ जून १९५६) हे ओडिशातील एक भारतीय राजकारणी आणि पाटणा (राज्य), बोलंगीरच्या पूर्वीच्या राजघराण्याचे सदस्य आहे. २०२४ पासून ते ओडिशाचे उपमुख्यमंत्री तसेच कृषी आणि शेतकरी सक्षमीकरण, ऊर्जा मंत्री म्हणून काम करत आहेत. ते भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्यही आहेत.

ते बोलंगीर येथील माजी खासदार राज राज सिंह देव यांचे पुत्र आणि ओडिशाचे माजी मुख्यमंत्री राजेंद्र नारायण सिंह देव यांचे नातू आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बीए पूर्ण केले. त्यांची पत्नी, संगीता कुमारी सिंह देव ह्या १२ व्या, १३ व्या, १४व्या आणि १६ व्या लोकसभेच्या सदस्य होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →