प्रयागराज हे भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील एक प्राचीन शहर आहे. काही दाव्यांप्रमाणे भारतातील दुसरे प्राचीन शहर आहे. हे शहर प्रयागराज जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
गंगा, यमुना या नद्यांचा प्रयागराज शहरानजीक संगम होतो. या नद्यांना सरस्वती नदीसुद्धा येऊन मिळते अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमामुळे या स्थानास हिंदू तीर्थक्षेत्र मानतात. कुंभमेळ्याच्या चार क्षेत्रांपैकी प्रयागराज एक असून, हरिद्वार, उज्जैन व नाशिक - त्र्यंबकेश्वर ही अन्य क्षेत्रे आहेत.
प्रयागराज
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.