गंगेचा उगम हा गंगोत्री या हिमनदीतून होतो. गंगेच्या मुख्य दोन नद्या आहेत भागीरथी आणि अलकनंदा. जेव्हा भागीरथी नदी १७५ किमीचा प्रवास पूर्ण करते त्यावेळेस अलकनंदा तिला मिळते आणि त्यापुढे ती गंगा या नावाने ओळखली जाते. अलकनंदा ही नदी ज्या ठिकाणी भागीरथी या नदीला मिळते त्या ठिकाणाला देवप्रयाग म्हणतात.
गंगा नदी (इंग्रजीत Ganges) ही दक्षिण आशियातील भारत व बांगलादेश या दोन देशातून वाहणारी एक महत्त्वाची नदी आहे. ब्रह्मपुत्रा (लांबी २,९०० कि.मी.) नदी ही भारतातील मोठी नदी आहे. गंगेची लांबी २,५२५ कि.मी. आहे. तिचा उगम भारतातील उत्तराखंड राज्यात हिमालय पर्वतातातील गंगोत्री येथे होतो. तेथून ती आग्नेय दिशेला वाहत येते व उत्तर भारतातील गंगेच्या खोऱ्यातून वाहत वाहत बांगलादेशामध्ये प्रवेश करते. बांगलादेशात ती बंगालच्या उपसागराला मिळते. तेथे सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश निर्माण होतो. सुंदरबनात बऱ्याच दुर्मीळ वनस्पती आणि बंगाली वाघ आढळतात.
हिंदू धर्मात गंगा नदीला अतिशय पवित्र मानले आहे. तिला माता म्हणले गेले आहे. गंगा नदी ही लक्षावधी भारतीयांची जीवनदायिनी आहे. भारतातील कनोज, कलकत्ता, कांपिल्य, काशी, कौशांबी, पाटलीपुत्र (पाटणा), प्रयाग, बेहरामपूर, मुंगेर, मुर्शिदाबाद, इत्यादी प्राचीन, ऐतिहासिक व आधुनिक नगरे गंगेच्या किनारी वसली आहेत.
अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत गंगा नदी बंगालच्या उपसागरास मिळत होती तर ब्रह्मपुत्रा नदी काही किलोमीटर पूर्वेस स्वतंत्रपणे मिळायची. साधारण अठराव्या शतकाच्या अखेरीस ब्रह्मपुत्रेने पश्चिमेस वळण घेतले व आता दोन्ही नद्यांचा अरिचा येथे संगम होतो. या बदलास इ.स. १८९७चा भूकंप काही अंशी कारणीभूत होता. यमुना ही गंगेची उपनदी स्वतःच एक स्वतंत्र आणि मोठी नदी आहे. ती गंगेला प्रयाग येथे येऊन मिळते.
डॉल्फिनच्या दोन जाती गंगेमध्ये सापडतात. त्यांना गंगेतिल डॉल्फिन आणि इरावती डॉल्फिन या नावाने ओळखले जाते. याशिवाय गंगेमध्ये असलेले शार्कसुद्धा प्रसिद्ध आहेत. गंगा नदीमधील विरघळलेला प्राणवायूची पातळी झपाट्याने खालावत आहो त्यामुळे जलचर धोक्यात आले आहेत. नदीतील पाण्यातील वाढते प्रदूषण त्याचे मुख्य कारण आहे.
गंगा नदी
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.