देवप्रयाग हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक लहान शहर आहे. उत्तराखंडमधील पंचप्रयागांपैकी एक असलेले देवप्रयाग अलकनंदा व भागीरथी नद्यांच्या संगमावर वसले असून ते राजधानी डेहराडूनच्या ११० किमी पूर्वेस स्थित आहे. देवप्रयाग येथेच गंगेची सुरुवात होते.
दिल्ली ते बद्रीनाथ दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग ५८ देवप्रयागमधून जातो.
देवप्रयाग
थोडक्यात पण महत्त्वाचे.