प्रदूषण

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

वातावरणात, पाण्यात, हवेत किंवा अन्‍नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण असे म्हणतात.

प्रदूषण ही आजच्या काळातील एक खूप गंभीर समस्या बनली आहे. वाढती लोकसंख्या, वृक्षतोड, औद्योगिक कचरा, नैसर्गिक साधनसंपत्तीचा गैरवापर अश्या अनेक कारणामुळे प्रदूषण भयंकर वाढत आहे. प्रदूषण ही समस्या आता फक्त भारतापुरती मर्यादित नसून जगभरात देखील ही समस्या खूप वाढत आहे.

वाढते प्रदूषण म्हणजे जीवन नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक वातावरण, जल आणि भूप्रदेशात मिसळणे. उदाहरणार्थ, हवेमध्ये डीझेल, पेट्रोल या इंधनातून सल्फर असलेला धूर वातावरणात मिसळतो. यामुळे वातावरणात अतिउच्च असलेल्या ओझोन वायूच्या थराला हानी पोहचून सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे पृथ्वीवर नको असताना पोहचतात.

प्रदूषणाची काही महत्त्वाची उदाहरणे -



पाणी प्रदूषण:अशुद्ध पाणी म्हणजे पाणी प्रदूषण, कारखान्यातील रसायने मिसळेले पाणी तलाव, नदी इत्यादी मध्ये सोडले जाते. त्यामुळे पाणी प्रदूषण होते. सध्या पाणी प्रदूषण हा एक गंभीर प्रश्न समाजासमोर आहे आणि त्यापेक्षा गंभीर परिस्थिती ही सांडपाणी व्यवस्थापनाची आहे.

हवाप्रदूषण: हवा प्रदूषण हे प्रामुख्याने कारखान्यांमधून निघणारा धूर तसेच गाड्यांमधून निघणारा धूर यांमुळे होते.

ध्वनिप्रदूषण: वाहनांचा ,कारखान्यातील यंत्र , वाहनाचा मोठा कर्कश आवाज तसेच गाण्यांचा मोठा आवाज यामुळे ध्वनी प्रदूषण होते.ध्वनिची तीव्रता मोजण्याचे परिणाम “डेसिबल” हे आहे. एका विशिष्ट डेसिबलपेक्षा अधिक ध्वनि असल्यास हे ध्वनि प्रदूषणाचे कारण ठरते. ८० ते १२० डेसिबल पर्यंतच्या तीव्रतेचा ध्वनि किंवा आवाज हानिकारक ठरू शकतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →