घनकचरा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

घनकचरा

शहरांमधील कचरा हा गुंतागुंतीचा व गंभीर प्रश्‍न बनत चालला आहे. आपल्या भोगवादी समाजाकडून रोज प्रचंड प्रमाणात घनकचरा टाकला जातो. संपूर्ण जगात प्रतिवर्षी सुमारे १०० कोटी टन कचरा निर्माण होत असावा असा अंदाज आहे. हा सगळा कचरा एके ठिकाणी रचला तर माऊंट एव्हरेस्ट इतक्या उंचीचा पर्वत उभा राहिल. जगातील सर्वाधिक भोगवादी देश म्हणजे अमेरिका. तिथे निर्माण झालेली घनकचऱ्याची समस्या सर्वात गंभीर आहे. अमेरिकेतला रोजचा घरगुती कचरा, व्यापारी कचरा, औद्योगिक टाकाऊ पदार्थ यांचा एकत्रित विचार केला तर तो ७,००,००० मेट्रिक टनाहून अधिक भरेल.

घन कचरा ढिगाऱ्यात फेकण्यामुळे शहर आणि गावं यांचं सौदर्य तर नष्ट होतंच पण त्यामुळे आरोग्यविषयक प्रश्‍न निर्माण होतात. हे कचऱ्याचे डोंगर रोगजंतूची वाहतूक करणाऱ्या माशा, डास, उंदीर आणि झुरळं यांच्या पैदाशीचे अड्डे बनतात. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी उपाय सुचविले गेले आहेत. शहराच्या विविध भागातला कचरा गोळा करणे, त्याची दूरवरच्या एखाद्या ठिकाणी वाहतूक करणे, त्या ठिकाणी एक तर तो जाळून टाकणे किंवा कंपोस्ट खतासाठी वापरणे किंवा तसाच टाकून देणे या प्रकारे त्याची व्यवस्था केली जाते.



शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा अभ्यास करणे व कचऱ्याचे व्यवस्थापन व विल्हेवाट कशाप्रकारे करता येईल याचा अभ्यास करणे आवश्यक आहे कचऱ्यामुळे आरोग्यविषयक प्रश्‍न निर्माण होतात. घनकचरा साठत राहण्याने उद्भवणाऱ्या समस्याही वाढत आहेत आणि त्यावरचे सोपे उपाय काही नजरेसमोर येत नाहीत.

वैद्यकीय कचरा हा देखील अलिकडे वाढू लागला आहे. मोठी हॉस्पिटले यांच्याकडे जमणाऱ्या सूई- सिरिंग, कापसाचे बोळे-बॅंडेज, प्लास्टर, आतडे-गर्भपिशवी, इत्यादी गोष्टींचा जैविक- वैद्यकीय-कचरा या संज्ञेत अंतर्भाव आहे. या कचऱ्याची हाताळणी व विल्हेवाट संदर्भात १९९८ या कायद्यात स्पष्ट निकष ठरवून निर्देश दिलेले आहेत. या कायद्याप्रमाणे या प्रकारच्या कचरा नियोजनावर देखरेख आणि अंकुश ठेवण्याची जबाबदारी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळावर आहे. आपल्या राज्यात ती जबाबदारी महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळावर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →