आण्विक कचरा

यामागील विज्ञान आणि इतिहास.

आण्विक कचरा (इंग्लिश: Radioactive waste, रेडिओअ‍ॅक्टिव्ह वेस्ट ;) म्हणजे अणुभंजनातून निर्माण झालेला कचरा. हा रेडियो उत्सर्जक म्हणजेच किरणोत्सारी असतो आणि यामुळे कर्करोग होतो. यासाठी बहुदा युरेनियम हे खनिज वापरले जाते.

अणुभट्टी कार्यान्वित झाल्यावर त्यातील इंधनामध्ये खूप प्रमाणात किरणोत्सारी भंजनोत्तर पदार्थ तयार होत असतात. परंतु हे ‘पदार्थ’ युरेनियम इंधन व त्यावरील धातूच्या अतिसुरक्षित कवचात बंदिस्त असल्याने सुरक्षित राहतात. हे भंजनोत्तर पदार्थ म्हणजे फिशन प्रॉडक्ट्स अणुकचऱ्याच्या स्वरूपात केवळ इंधन फेर प्रक्रियेनंतरच अस्तित्वात येतात. अणुभट्टी चालू असताना अशा पदार्थाची गळती झाल्यास त्या अणुकचऱ्याची विल्हेवाट लावणे आवश्यक ठरते. या व्यतिरिक्त न्यूट्रॉनच्या प्रहारामुळे तयार होणाऱ्या किरणोत्सारी पदार्थ अणुकचऱ्याच्या स्वरूपात तयार होतो.

हा कचरा समुद्रतळाशी शिश्याच्या पेट्यांमध्ये ठेवला जातो. हा कचरा अंतराळात सोडण्याच्याही कल्पना पुढे आल्या आहेत.रेडियो उत्सर्जन हे पोटाद्वारे,श्वासाद्वारे,शोषल्या गेल्यामुळे वा टोचल्या गेल्यामुळे शरीरात गेल्यास मानवास अत्यंत हानीकारक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →