प्रतिमा भौमिक (२८ मे, १९६९ - ) या एक भारतीय राजकारणी आहेत. या दुसऱ्या मोदी मंत्रालयात सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहे. केंद्रीय मंत्री बनणाऱ्या त्या पहिल्या त्रिपुराच्या रहिवासी आणि ईशान्य भारतातील दुसऱ्या महिला ठरल्या आहे. भारतीय जनता पक्षाच्या सदस्या म्हणून त्या त्रिपुरा पश्चिम येथून लोकसभेवर निवडून आल्या. त्यांना जानेवारी २०१६ मध्ये त्रिपुराचे विद्यमान मुख्यमंत्री बिपलब कुमार देब यांच्या संघात राज्य सरचिटणीस म्हणून सामील करण्यात आले. सन् १९९१ पासून त्या भाजपच्या सदस्या आहेत. त्या "दीदी" या नावाने प्रसिद्ध आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रतिमा भौमिक
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.