प्रतिबंध (हिंदी चित्रपट)

या विषयातील रहस्ये उलगडा.

प्रतिबंध हा १९९० चा रवी राजा पिनिसेट्टी दिग्दर्शित आणि चिरंजीवी, जुही चावला आणि रामी रेड्डी यांनी अभिनय केलेला हिंदी भाषेतील ॲक्शन चित्रपट आहे. या चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेता चिरंजीवीने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी चावलाला ३६ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले. हा चित्रपट १९८९ च्या तेलुगू चित्रपट अंकुसमचा रिमेक आहे व व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →