लेफ्टनंट जनरल प्रकाश मणी त्रिपाठी (जन्म ३० जून १९३५) हे भारतीय राजकारणी आणि देवरिया लोकसभा मतदारसंघातील लोकसभेचे माजी सदस्य आहेत.
जून १९५५ मध्ये ते भारतीय सैन्यात भरती झाले आणि त्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये सेवा केली. फेब्रुवारी १९५७ मध्ये ६३ घोडदळात ते सामील झाले व नागालँडमध्ये १९६४-६५ दरम्यान स्क्वाड्रन कमांडर म्हणून काम केले. १९७१ च्या भारत-पाक युद्धादरम्यान ते बांगलादेशात लढले.
त्यांना १९८६ मध्ये अति विशिष्ट सेवा पदक आणि १९९२ मध्ये परम विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले.
देवरिया मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे ते ११ व्या लोकसभा आणि १३ व्या लोकसभेचे सदस्य होते.
प्रकाश मणी त्रिपाठी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.