प्यिमाँत

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

प्यिमाँत

प्यिमॉंत (इटालियन: Piemonte; प्यिमॉंती व ऑक्सितान: Piemont; फ्रेंच: Piémont) हा इटलीच्या २० प्रदेशांपैकी एक आहे. इटलीच्या वायव्य भागात आल्प्स पर्वतरांगेमध्ये वसलेल्या प्यिमॉंतच्या पश्चिमेस फ्रान्स तर उत्तरेस स्वित्झर्लंड हे देश आहेत. सुमारे २५ हजार चौरस किमी क्षेत्रफळ असलेला प्यिमॉंत हा आकाराने सिसिलीखालोखाल इटलीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मोठा प्रदेश आहे. पो ही इटलीमधील प्रमुख नदी येथेच उगम पावते. तोरिनो ही प्यिमॉंतची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

प्यिमॉंत इटलीमधील वाइन उत्पादक भागातील प्रमुख प्रदेश आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →