पोलिझियानो

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

पोलिझियानो

आन्योलो आंब्रोगिनी, अँजेलो आंब्रोगिनी, अँजेलो पोलिझियानो तथा पोलिझियानो (१४ जुलै, १४५४ - २४ सप्टेंबर, १४९४) हा पंधराव्या शतकातील इटालियन विद्वान आणि इटलीतील रिनैसाँ काळातील कवी होता.



पॉलिझियानोने होमरच्या इलियडच्या भागांचे इटालियनमध्ये भाषांतर केले होते याशिवाय त्याने अनेक विषयांवर शास्त्रीय टिप्पणी आणि आणि साहित्यावरील भाष्य केले आहे. त्याच्या विद्वत्तेची दखल फिरेंझेवर राज्य करणाऱ्या श्रीमंत आणि शक्तिशाली मेदिची कुटुंबाने घेतली. त्यांनी पोलिझियानोला आपल्या कुटुंबातील मुलांचा शिक्षक म्हणून नेमले. हा नंतर अनेक मेदिची शासकांचा जवळचा मित्र आणि राजकीय सल्लागार झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →