पॉल रुड

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

पॉल रुड

पॉल स्टीफन रुड (६ एप्रिल १९६९) हा एक अमेरिकन अभिनेता आहे. १९९१ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्याने कॅन्सस विद्यापीठ आणि अमेरिकन अॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्समध्ये नाटकांचा अभ्यास केला. त्याला जुलै २०१५ मध्ये हॉलीवूड वॉक ऑफ फेममध्ये एक स्टार मिळाला. २०१९ मध्ये फोर्ब्स सेलिब्रिटी १०० च्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला. २०२१ मध्ये, पीपल मासिकाच्या " सेक्सिएस्ट मॅन अलाइव्ह " म्हणून त्याला घोषित करण्यात आले.

क्ल्युलेस (१९९५), हॅलोवीन: द कर्स ऑफ मायकल मायर्स (१९९५), रोमियो + ज्युलिएट (१९९६), वेट हॉट अमेरिकन समर (२००१), अँकरमन: द लीजेंड ऑफ रॉन बरगंडी (२००४), द फोर्टी-इयर-ओल्ड व्हर्जिन (२००५), नॉक्ड अप (२००७), आय लव्ह यू मॅन (२००९), दिस इज फोर्टी (२०१२) आणि घोस्टबस्टर्स: आफ्टरलाइफ (२०२१) हे त्याचे प्रमुख चित्रपट आहेत. त्याने मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये अँट-मॅनची भूमिका केली आहे. या भूमिकेची सुरुवात अँट-मॅन (२०१५) पासून झाली आणि अगदी अलीकडे अँट-मॅन अँड द वास्प: क्वांटुमॅनिया (२०२३) मध्ये त या भूमिकेत दिसला.

पॉल रुड हा माईक हॅनिगनच्या भूमिकेत एनबीसी सिटकॉम फ्रेंड्स, टिम अँड एरिक ऑसम शो, ग्रेट जॉब मधील भूमिकांसह अनेक दूरचित्रवाणी कार्यक्रममध्ये देखील दिसला आहे! लिव्हिंग विथ युवरसेल्फ या नेटफ्लिक्स विनोदी मालिकेत त्याने दुहेरी भूमिका केली होती, ज्याने त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार नामांकन मिळवून दिले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →