पॅरिस करार

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

पॅरिस करार, पॅरिस एकमत तथा पॅरिस पर्यावरण करार हा संयुक्त राष्ट्राच्या जागतिक वातावरण बदलाच्या सभेतील (यु एन एफ सी सी सी) एक करार आहे. हा करार हरितगृह वायूच्या उत्सर्जन, उपशमन व त्यासाठीच्या आर्थिक तरतुदींबद्दल आहे.

१९५ देशांच्या प्रतिनिधींनी वातावरण बदलाच्या सभेच्या पॅरिस येथे झालेल्या २१व्या संमेलनात वाटाघाटी करून या कराराचा मसुदा निश्चित केला व १२ डिसेंबर २०१५ रोजी या कराराला एकमताने मान्यता दिली. सर्व देशांनी आपापल्या संसदेची मान्यता मिळवून करारावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यासाठी २२ एप्रिल २०१६ (पृथ्वी दिवस) पासून पुढे एक वर्ष कालावधी देण्यात आलेला होता. सध्या जगभरातून होणाऱ्या एकूण हरितगृह वायू उत्सर्जनापैकी किमान ५५ टक्के उत्सर्जनासाठी कारणीभूत असलेल्या ५५ देशांनी अधिकृत सह्या केल्या की हा करार सर्व जगाला लागू झाला असे मानण्याला सर्व देशांनी मान्यता दिलेली होती. ४ ऑक्टोबर २०१६ रोजी या अटीची पूर्तता झाली आणि ४ नोव्हेंबर २०१६ पासून हा करार अधिकृतरित्या लागू झाला असे जाहीर करण्यात आले.

या कराराची अंमलबजावणी २०२१ साली सुरू होणार आहे. तोपर्यंत कराराच्या अंमलबजावणीसाठी व अंमलबजावणीच्या पडताळणीसाठीचे सर्व नियम व अटी निश्चित केल्या जात आहेत. दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये होणाऱ्या वातावरण बदलाच्या सभेच्या वार्षिक अधिवेशनामध्ये यांवर वाटाघाटी होतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →