पॅराग्लायडिंग

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

पॅराग्लायडिंग

पॅराग्लायडिंग हा हवेतील उड्डाण विषयक साहसी क्रीडा प्रकार आहे. यात विशिष्ट प्रकारच्या कापड व दोरीच्या सहाय्याने पंख ‍‍तयार करतात व ते हार्नेसला जोडून चालक त्यात बसतो. हवेच्या झोतावर स्वार होऊन हे उंच भरारी घेते. ग्लायडर मध्ये कोणतेही कठीण धातू नसतात व त्याचा वेग हा हवेच्या दिशेप्रमाणे संतुलित होतो. पॅराग्लायडर कमी वेगाचे हलके व स्वस्त उड्डाणाचे साधन आहे. कोणतेही मशीन न वापरताही ग्लायडर द्वारे केवळ हवेच्या झोतावर तासनतास कित्येक हजार फुटापर्यंत हवेत उंच भरारी मारू शकते. एका मोठ्या पंखाखाली काही बेल्ट्सच्या मदतीने पायलट बसलेला असतो. पंखाचा आकार हा सस्पेंशन वायर्स आणि हवेच्या उच्च दाबामुळे व्यवस्थित राहतो.

इंजिन नसतांनासुद्धा पॅराग्लायडर्स तासनतास आणि शेकडो किलोमीटर्स उडू शकतात, तरी १-२ तास आणि काही किलोमीटर्सचा प्रवासही असामान्य आहे. हवेच्या दबावाचा व्यवस्थित वापर करून पायलट काही हजार मीटरची उंची सहजपणे गाठू शकतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →