पूर्णा नदी (गोदावरी नदीची उपनदी)

या विषयातील रहस्ये उलगडा.

पूर्णा नदी (गोदावरी नदीची उपनदी)

पूर्णा नदी(दक्षिण) ही मराठवाडयातील एक नदी असून गोदावरी नदी ची प्रमुख उपनदी आहे. ही नदी छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातून वाहते. परभणी जिल्ह्यातील जांभूळबेट येथे गोदावरी नदीस मिळते.

पूर्णा नदी वर हिंगोली जिल्ह्यात दोन धरण उभारलेले आहे,त्यातील एक येलदरी येथे विद्युत निर्मिती केली जाते व सिधेश्वर धरणातून सिंचानासाठी कालवा काढण्यात आला आहे.



परभणी जिल्ह्यात नदी काठी पूर्णा हे शहर वसलेले आहे. तर जालना जिल्ह्यात पूर्वीचे पूर्णापुर म्हणजे जाफराबाद हे शहर वसलेले आहे

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →