पुलित्झर पुरस्कार

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

पुलित्झर पुरस्कार

पुलित्झर पुरस्कार हा वृत्तपत्रीय सदरलिखाण, वाङ्मय आणि सांगीतिक रचनेसाठी दिला जातो. इ.स. १९१७ साली अमेरिकन प्रकाशक जोसेफ पुलित्झर याने हा पुरस्कार सुरू केला.अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठाकडे या पुरस्काराचे व्यवस्थापन आहे. दरवर्षी २१ प्रकारच्या साहित्याला हा पुरस्कार दिला जातो. दहा हजार डॉलर रोख आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. समाजसेवास्वरूप वृत्तपत्रीय लेखनासाठी एक सुवर्णपदकही असते.

जोसेफ पुलित्झर यांच्या इ.स. १९०४ च्या मृत्युपत्रानुसार, लेखनास उत्तम प्रोत्साहन प्रदान करण्याच्या हेतूने हा पुरस्कार पुलित्झर यांनी सुरू केला. पत्रकारितामध्ये चार, अक्षरे आणि नाटक श्रेणीत चार, शिक्षण श्रेणीत एक असे पारितोषिके आणि पाच प्रवासी शिष्यवृत्ती यासाठी पुलित्झर दिला जातो. हा पुरस्कार कोलंबिया यूनिवर्सिटीकडून दिला जातो.

या पुलित्झर पुरस्काराला, पुलित्झर सन्मान किंवा पुलित्झर पारितोषिक असेही म्हणले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →