पुनीत बालन

या विषयातील रहस्ये उलगडा.

पुनीत बालन

पुनीत बालन हे भारतीय उद्योजक, चित्रपट निर्माते , क्रिकेट खेळाडू व सामाजिक कार्यकर्ते आहेत. ऑटोमोबाईल, रिअल इस्टेट, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रसिद्ध उद्योजक एस. बालन यांचे ते सुपुत्र आहेत. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे ते विश्वस्त तसेच उत्सवप्रमुख आहेत. पुणे जगवर्स (टेनिस), मुंबई खिलाडीज (खो खो), महाराष्ट्र आयर्न मॅन (हॅन्डबॉल), प्रीमियर बॅडमिंटन, टेबल टेनिस असे विविध क्रीडा प्रकारातील संघाचे ते मालक आहेत. काश्मीरी विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी त्यांनी भारतीय लष्कराकडून चालविण्यात येत असलेल्या दहा शाळा भारतीय लष्करासोबत चालविन्यास घेतल्या असून या सर्व शाळा बारामुल्ला, कुपवाडा, अनंतनाग, पेहलगाम, पुलवामा, शोपियान, उरी, त्रेगम, व्हेन, घुरेस या भागात या सर्व शाळा आहेत. बारामुल्ला येथील विशेष मुलांसाठी असलेल्या डगर स्कुलला देखील भारतीय लष्करासोबत ते चालवत आहेत. काश्मीर मध्ये केलेल्या समाजकार्याबद्दल पुनीत बालन यांना भारतीय लष्कराकडून गौरवण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →