पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्ग हा भारतामधील एक रेल्वेमार्ग आहे. हा मार्ग पुणे येथे मुंबई-चेन्नई रेल्वेमार्गापासून वेगळा होतो व दक्षिणेकडे धावतो. पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व प्रमुख शहरांमधून जाणारा ४६८ किमी लांबीचा हा मार्ग कर्नाटकातील लोंढा ह्या लहान गावामध्ये हुबळी-गोवा रेल्वेमार्गाला जुळतो. महाराष्ट्रातील सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर तसेच कर्नाटकातील बेळगाव इत्यादी महत्त्वाची शहरे ह्याच मार्गावर आहेत. कोकण रेल्वे चालू होण्याअगोदर गोव्याला रेल्वेमार्गाने जोडणारा हा एकमेव दुवा होता.
मे २०१६ मध्ये भारत सरकारने पुणे-मिरज-लोंढा मार्गाचे दुपदरीकरण करण्याची योजना जाहीर केली.
पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्ग
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.