मिरज हे दक्षिण महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे शहर आहे आणि भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याचा एक तालुका आहे.सांगली जिल्ह्यातील दुसरे मोठे शहर आहे. मिरज एक महानगरपालिका सुद्धा आहे. मिरजेचा इतिहास गेल्या एक हजार वर्षांपासून ज्ञात आहे. ते आदिलशाहीतील एक महत्त्वाचे ठिकाण होते.
मिरज हे एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे.दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन आहे. वैद्यकीय सोईसुविधा आणि शास्त्रीय संगीत यासाठीही पश्चिम महाराष्ट्रात मिरज शहर सर्वात प्रसिद्ध आहे.
मिरज शहरात वानलेस मेमोरियल रुग्णालय, वानलेस उरो रुग्णालय, मुंबईच्या सिद्धिविनायक गणपती ट्रस्टचे सिद्धिविनायक कर्करोग रुग्णालय आणि इतर अनेक रुग्णालये आहेत. शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयसुद्धा आहे. दर्जेदार वैद्यकीय सोयींची उपलब्धता आणि रुग्णांना लवकर उतार पडेल अशी हवा या कारणांमुळे महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधूनही अनेक लोक औषध उपचारासाठी मिरजेला येतात. यामुळेच मिरजेला आरोग्य पंढरी म्हटली जाते.
मिरज शहर हे विविध प्रकारच्या तंतुवाद्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. प्रख्यात गायक उस्ताद अब्दुल करीम खान यांचे मिरजेत दीर्घकाळ वास्तव्य होते..त्यांच्या नावाने दरवर्षी संगीत महोत्सव भरवला जातो.मिरजेतील उरूस प्रसिद्ध आहे.
मिरासाहेब दर्गा, मिरज
मिरसाहेब दर्गा ही मिरजच्या रेल्वे स्टेशनजवळ स्थित मुस्लिम आणि हिंदू दोन्ही समुदायांसाठी एक सामान्य उपासना केंद्र आहे.
हजरात मीरासाहेब आणि त्यांचा मुलगा हजरत शमासुद्दीन हुसैन यांचा आशीर्वाद घेण्यासाठी दर गुरुवारी सकाळी हजारो लोक दरगाहकडे येतात. हजरत मीरासाहेब त्यांच्या काळातील एक सुफी संत होते. असे म्हणले जाते की अल्लाहच्या आज्ञेवरून ते मक्का (सौदी अरेबिया) येथून भारतात आले होते. त्यांनी आपल्या जीवनातून इस्लामचा प्रचार केला. दरवर्षी साजरा होणाऱ्या सणात लाखो लोक याठिकाणी भेट देतात व त्यांच्या शुभेच्छा देतात.
मिरज
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.