पालगुमी साईनाथ (इ.स. १९५७:चेन्नई, भारत - ) हे भारतातील ग्रामीण वास्तव आणि शेतकरी आत्महत्येचा प्रश्न यांवर लेखन करणारे पत्रकार आहेत.
द हिंदू या इंग्लिश वृत्तपत्राच्या ग्रामीण व्यवस्था विभागाचे ते माजी संपादक आहेत. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.
पी. साईनाथ यांनी पारी (पीपल्स आर्काईव्ह ऑफ रूरल इंडिया) या नावाच्या एका कार्यक्रमाची स्थापना केली आहे.
भारताचे माजी राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांचे ते नातू आहेत.
पी. साईनाथ
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.