पितृसत्ता

या विषयातील रहस्ये उलगडा.

पितृसत्ता या संज्ञेमधून पित्याची सत्ता असा अर्थ ध्वनित होतो. इंग्रजी शब्द 'patriarchy' साठी पुरुषप्रधानता, पुरुष सत्ता, पितृसत्ता सारख्या शब्दांचा वापर केला जातो. 'कुटुंबामध्ये चालणारी पित्याची सत्ता' हा त्याचा शाब्दिक अर्थ आहे.

पितृसत्ता ही सामाजिक, राजकीय व आर्थिकदृष्ट्या कार्यरत असणारी सत्तेची संरचना आहे. ज्याच्या आधारे स्त्रीयांना दुय्यमत्त्व दिले जाते.

भेदभाव, दुर्लक्ष, नियंत्रण, शोषण, दडपशाही, हिंसा या स्वरूपात स्त्रियांवर कुटुंबात, कामाच्या ठिकाणी व समाजात दुय्यमत्व लादले जाते.

आधुनिक स्त्रीवादी विचारप्रक्रियेमधील महत्त्वाची संकल्पना म्हणून 'पितृसत्तेचा विचार होतो. स्त्रीवादी चळवळ, स्त्री-अभ्यास, स्त्रीवादी राजकारण या सर्वाना पुढे नेण्यासाठी 'पितृसत्तेचा विरोध' करणे हा एक कार्यक्रम असतो.'लिंगभाव' या संकल्पनेबरोबरच 'पितृसत्ता' ह्या संकल्पनेचा वापर स्त्रियांना संरचनात्मक आणि व्यवस्थात्मक दुय्यमत्व देण्यासाठी केला जातो, असा स्त्रियांचा आक्षेप असतो.

पितृसत्ता ही एक विशिष्ट समाजामध्ये पुरुष अधिकार व सत्तेची रचना स्पष्ट करणारी संज्ञा नसून याकडे एक विश्लेषणात्मक श्रेणी म्हणून बघणे आवश्यक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →