पारलिंगी स्वभिमान ध्वज, किंवा पारलिंगी ध्वज व्यक्ती, संस्था आणि समुदाय पारलिंगी व्यक्तींचे स्वाभिमान आणि हक्कांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरतात. या ध्वजाचा उपयोग मूळ इंद्रधनुष्य ध्वजासारखाच असून , याचा वापर विशिष्टपणे पारलिंगी समुदायाच्या संबंधात केला जातो.
हा ध्वज १९९९ मध्ये मोनिका हेल्म्स यांनी संकल्पित केला होताआणि तेव्हापासून जगभरातील पारलिंगी समुदायाने हा ध्वज स्वीकारला आहे.
या ध्वजात हलका निळा, हलका गुलाबी, पांढरा, हलका गुलाबी आणि हलका निळा अशा क्रमाने तीन रंगांचे पाच आडवे पट्टे आहेत. या संबंधित आणखी ध्वज देखील आहेत, ज्यामध्ये पारलिंगी आणि माध्यलिंगी ध्वजांसह इंद्रधनुष्य ध्वजाच्या "प्रगती" आवृत्तीला एकत्र करणारे ध्वज, तसेच पारलिंगी आणि अद्विवर्णी समुदायांमधील सुस्थानाक समुदायांचे विविध ध्वज आहेत.
पारलिंगी ध्वज
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.