जुलै २०२५ मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाने बांगलादेश क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला. या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले. ही मालिका दोन्ही संघांसाठी, २०२५ आशिया चषक आणि २०२६ पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून खेळविली गेली. हे सामने ढाका येथील शेर-इ-बांग्ला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आले. मार्च २०२५ मध्ये, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले.
मूळतः, हा दौरा फ्युचर टूर्स प्रोग्राम (FTP) अंतर्गत तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांचा होता. तथापि, २०२६ मध्ये होणाऱ्या आयसीसी पुरुष टी२० विश्वचषकासाठी, दोन्ही बोर्डांनी परस्पर सहमतीने तीन सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेवर सहमती दर्शवली.
बांगलादेशने पाकिस्तानवर त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय टी२० मालिका विजय मिळवत मालिका २-१ च्या फरकाने जिंकली.
पाकिस्तानी क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२५
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.