पाकिस्तानचा राजकीय इतिहास (उर्दू: پاکستان کی سیاسی تاریخ) हे पाकिस्तानच्या राजकीय घटना, कल्पना, हालचाली आणि नेत्यांचे वर्णन आणि विश्लेषण आहे. कालानुक्रमे भारतातील साम्राज्ये, हखामनी साम्राज्य, खिलाफत, मंगोल, मुघल, मराठा साम्राज्य, दुराणी साम्राज्य, शीख आणि ब्रिटिश वसाहत यांची पाकिस्तानावर सत्ता होती. इ.स. 1947 मध्ये पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखाली झाली.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या शेवटी ब्रिटिश भारताची फाळणी होऊन पाकिस्तान या मुस्लिमबहुल स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली. भारताच्या वायव्येला पश्चिम पाकिस्तान आणि पूर्वेला पूर्व पाकिस्तान यांचा मिळून पाकिस्तान देश बनला.
हे दोन्ही विभाग भौगोलिकदृष्ट्या मध्ये असलेल्या भारतामुळे विलग झाले होते. इ.स. 1965 मध्ये पाकिस्तानच्या राज्यघटनेला जनमान्यता मिळाल्यानंतर पाकिस्तान हे इस्लामी प्रजासत्ताक झाले. इ.स. 1972 मध्ये सशस्त्र क्रांतीनंतर पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांगलादेश या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली.स्वातंत्र्य मिळाल्यापासून, पाकिस्तानचा रंगीबेरंगी पण अशांत राजकीय इतिहास आहे, ज्यामध्ये अनेकदा मार्शल लॉ आणि अकार्यक्षम नेतृत्व होते.
पाकिस्तानचा राजकीय इतिहास
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?