पाकिस्तान क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९८९ दरम्यान तीन कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली तर एकदिवसीय मालिका न्यू झीलंडने ३-१ ने जिंकली.
ड्युनेडिन येथील पहिली कसोटी पावसामुळे रद्द झाल्याने त्याऐवजी नियोजित कसोटीच्या चौथ्या दिवशी अर्थात ६ फेब्रुवारी १९८९ रोजी आणखी एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. हा सामना एकदिवसीय मालिकेत ग्राह्य धरण्यात आला नाही. मालिकेबाहेरचा हा एकमेव एकदिवसीय सामना न्यू झीलंडने ८ गडी राखत जिंकला.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८८-८९
यामागील विज्ञान आणि इतिहास.