पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२४

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२४

पाकिस्तान क्रिकेट संघाने मे २०२४ मध्ये चार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांच्या तयारीचा ही मालिका भाग बनली. जुलै २०२३ मध्ये, इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ईसीबी) ने सामन्यांची पुष्टी केली.

लीड्समध्ये मुसळधार पावसामुळे पहिला सामना रद्द करण्यात आला होता. बर्मिंगहॅममधील दुसरा सामना इंग्लंडने २३ धावांनी जिंकला आणि त्या सामन्यात जोफ्रा आर्चरने दुखापतीतून बरे झाल्यावर वर्षभरातला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. कार्डिफमधील तिसरा सामना पावसामुळे वॉशआउट झाला. लंडनमधील चौथा सामना इंग्लंडने ७ गड्याने जिंकून मालिका २-० ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →