पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाने मे २०२४ मध्ये आयर्लंडविरुद्ध तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला. ही मालिका २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकपूर्वी दोन्ही संघांच्या तयारीचा एक भाग बनली होती. दोन्ही संघांमधील ही पहिली द्विपक्षीय टी२०आ मालिका आहे. जुलै २०२३ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) ने पाकिस्तानच्या सुधारित २०२३-२०२५ फ्यूचर टूर्स प्रोग्रामचा भाग म्हणून द्विपक्षीय मालिका जाहीर केली. मार्च २०२४ मध्ये, क्रिकेट आयर्लंडने दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले. २०१८ मध्ये पाकिस्तानने शेवटचा आयर्लंडचा दौरा केला होता.
आयर्लंडने सलामीचा सामना ५ गडी राखून जिंकला. पाकिस्तानने दुसरा सामना ७ गडी राखून जिंकून मालिकेत बरोबरी साधली. पाकिस्तानने तिसरा सामना ६ गडी राखून जिंकला आणि मालिका २-१ ने जिंकली.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२४
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.