पांढर्‍या पुठ्ठ्याचे गिधाड

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

पांढर्‍या पुठ्ठ्याचे गिधाड

पांढऱ्या पुठ्ठ्याचे गिधाड किंवा बंगाली गिधाड हा दक्षिण आणि आग्नेय आशियातील एक मृतभक्षक शिकारी पक्षी आहे. इ.स. १९९०पासून यांची संख्या झपाट्याने कमी झाली, तकी की, १९९२ ते २००७ या काळात यांची संख्या ९९.९ टक्क्यांनी कमी झाली. त्यामुळे या पक्षाला आय.यू.सी.एन.च्या लाल यादीमध्ये अतिशय चिंताजनक प्रजातीचा दर्जा दिला गेला. १९८० च्या दशकात यांची संख्या काही कोटींमध्ये होती. याला "जगातील सर्वात मुबलक मोठा शिकारी पक्षी" मानले जात असे. २०१६मध्ये यांची संख्या १०,००० पेक्षा कमी वर्तवण्यात आली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →