पांडुरंग गोविंद शास्त्री पारखी उर्फ भावगुप्तपद्म (जन्म : कडूस - तालुका खेड - पुणे जिल्हा), २४ नोव्हेंबर १८४४; - पुणे, २९मार्च १९११)हे मराठीतील निबंधकार व कवी होते. पांडुरंग गोविंद शास्त्री पारखी ह्यांनी पुण्यातील पंडित बाळशास्त्री देव ह्यांच्या संस्कृत पाठशाळेत व्याकरण, व्युत्पत्ती, अलंकार इत्यादी विषयांचे अध्ययन केले होते.
त्यांची कालिदासाच्या ऋतुसंहारावर आधारित "षड्ऋतुवर्णन" ही रचना इ.स. १८८७साली पुस्तकरूपाने प्रकाशित झाली. त्यांनी विविध प्रकारच्या अन्योक्ती आणि काही काव्यकूटे भावगुप्तपद्म या नावाने लिहिली. पांडुरंग पारखींनी लिहिलेले निबंध, हे उपलब्ध ताम्रपट, शिलालेख, चिनी प्रवाशांचे ग्रंथ आदींचा अभ्यास करून ऐतिहासिक दृष्टीने लिहिले आहेत.
पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.