पहिला कोसिमो दे मेदिची

या विषयावर तज्ञ बना.

पहिला कोसिमो दे मेदिची

पहिला कोसिमो दे मेदिची (१२ जून, १५१९ – २१ एप्रिल, १५७४) हा पंधराव्या शतकातील इटलीमधील फिरेंझेचा दुसरा आणि शेवटचा ड्यूक होता. याचा चुलतभाउ अलेस्सांद्रो दे मेदिचीची हत्या झाल्यावर कोसिमो ड्यूक झाला. १५३७-३९ दरम्यान या पदावर राहून तो नंतर तोस्कानाचा पहिला ग्रँड ड्यूक झाला. हा मरिया साल्व्हिआती आणि लुदोव्हिको दे मेदिचीचा मुलगा आणि कॅटेरिना स्फोर्झाचा नातू होता. कोसिमोची आई मरिया ही लॉरेंझो दे मेदिचीची नात होती. कोसिमो वडिलांकडून बांको दै मेदिचीच्या स्थापक जियोव्हानी दि बिक्की दे मेदिचीच्या पणतू जियोव्हानी इल पोपोलानोचा नातू होता.



याने सिएना जिंकून घेउन तोस्कानामधील फिरेंझेचे प्रजासत्ताक बळकट केले. त्याने आपले प्रशासन व्यवस्थित करण्यासाठी फिरेंझे शहरात उफिझी (कार्यालय) बांधले. त्याने पलाझ्झो पित्तीचा विस्तार केला आणि बोबोली बागांचा मोठा भाग त्याच्या कारकिर्दीत तयार केला गेला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →