मीर कमरुद्दीन खान सिद्दिकी (रोमन लिपी: Mir Qamar-ud-din Khan Siddiqi) ऊर्फ पहिला आसफ जाह (जन्म : २० ऑगस्ट, इ.स. १६७१; - १ जून, इ.स. १७४८) हा मुघल साम्राज्यातील मनसबदार व आसफ जाही घराण्याचा संस्थापक होता. त्याला दिलेल्या चिनकिल्च खान (औरंगजेबाने इ.स. १६९०-९१मध्ये दिलेली उपाधी), निझाम-उल-मुल्क फरुखशियार याने इ.स. १७१३मध्ये दिलेली उपाधी), आसफ जाह (मुहम्मदशाहाने इ.स. १७२५ साली दिलेला किताब) या उपाधींनी तो ओळखला जातो.
मीर कमरुद्दीन खान सिद्दिकीला मुघलांनी त्यांच्या दख्खन सुभ्याचा सुभेदार, अर्थात निझाम-उल-मुल्क, म्हणून नेमले. त्याच्यापासून हैदराबादच्या निजामांची राजवट सुरू झाली.
[[वर्ग::इ.स. १६७१ मधील जन्म]]
पहिला असफ जाह
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.