तिसरा असफ जाह

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

तिसरा असफ जाह

सिकंदर जाह, तिसरा असफ जाह (११ नोव्हेंबर, १७६८ - २१ मे, १८२९), हा १८०३ ते १८२९ पर्यंत भारताच्या हैदराबादचा तिसरा निजाम होता. त्यांचा जन्म खिलवाथमधील चौमहल्ला पॅलेसमध्ये झाला, तो असफ जाह दुसरा आणि तहनियत उन-निसा बेगम यांचा दुसरा मुलगा होता.

त्यांच्या पत्नींपैकी एक जहां परवर बेगम तथा हाज्जी बेगम होती. ती अझीम उल-उमारा तथा माअली मियां किंवा फरजंद बेगम हिची मुलगी आणि अरास्तु जाह यांची नात होती. आणि मुनीर उल-मुल्क यांची भाची होती. तिच्या अनेक नातेवाईक बायका निजाम घराण्याशी निगडीत होत्या. सिकंदर जाहची दुसरी पत्नी फजिलत-उन-निसा बेगम तथा चांदनी बेगम नसिर-उद-दौला आणि मुबारेझ-उद-दौला यांची आई होती.



मुली

जमाल-उन-निसा बेगम (मृत्यू २२ मार्च १८५५), सुरतचा निजाम सफदर-उद-दौला याचा भाऊ रफी-उद-दौलाशी विवाहित;

कमल-उन-निसा बेगम, मीर मोईन-उन-दिन हुसेन खान, गझनफर जंग, इम्तियाज-उद-दौला यांच्याशी विवाहित;

२५ मे १८२१ रोजी जफर-याब जंगच्या मुलाशी लग्न झालेली मुलगी;

सुलतान-उन-निसा बेगम, मोहम्मद सुलतान-उद-दीन खान, सबकत जंग, नवाब शम्स-उल-उमरा बहादूर यांचा मुलगा मुहताशाम-उद-दौलाशी विवाहित;

नामदार-उन-निसा बेगम, मीर आलमचा नातेवाईक मीर अब्दुल कासिम सोहराब जंग मोइन-उद-दौलाशी विवाहित;

हशमत-उन-निसा बेगम, शम्स उल-उमारा, विकार उल-उमारा, अमीर-इ-कबीर, इक्तिदार उल-मुल्क, इक्तिदार उद-दौला, नवाब अबुल खैर खान बहादूर;

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →