पहला नशा (हिंदी गीत)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

पहला नशा हे १९९२ च्या जो जीता वही सिकंदर या चित्रपटातील एक गीत आहे. हे गाणे उदित नारायण आणि साधना सरगम ​​यांनी गायले तर मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिले होते. जतिन-ललित यांनी याला संगीत दिले होते. या गाण्यावर आमिर खान, आयेशा जुल्का आणि पूजा बेदी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हे संपूर्ण गाणे पूर्णपणे स्लो मोशनमध्ये चित्रित केले गेले होते. फराह खानच्या कोरिओग्राफीचे कौतुक झाले. या गाण्याचे संगीत अत्यंत लोकप्रिय झाले. या गाण्यासाठी उदित नारायण यांना फिल्मफेर सर्वोत्तम पार्श्वगायक पुरस्काराचे नामांकन मिळाले.

९० च्या दशकात या गाण्याचे रिमिक्स केले गेले, तेही खूप गाजले. हे बॉलीवूडमधील सदाबहार गाण्यांपैकी एक मानले जाते. "पहला नश" गाण्याला स्लो मोशनमध्ये चित्रित केलेले भारतातील पहिले गाणे म्हणून चुकीचे श्रेय देण्यात येते. पण प्रत्यक्षात पहिले गाणे मेहमूदचे लाखों में एक (1971) आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →