जो जीता वही सिकंदर हा १९९२ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन आणि सह-लेखन मन्सूर खान यांनी केले आणि नासिर यांनी निर्मिती तसेच सह-लेखन केले होते. आमिर खानची प्रमुख भूमिका असलेल्या ह्या चित्रपटात आयेशा झुल्का, दीपक तिजोरी, पूजा बेदी, मामिक सिंग आणि कुलभूषण खरबंदा यांच्या भूमिका आहेत. चित्रपटात संगीत जतिन-ललित यांचे आहे.
चित्रपटाची कथा देहरादून येथील काही कॉलेजच्या मुलांमधील चढाओढीवर आधारित आहे. जो जीता वही सिकंदरला तिकिट खिडकीवर चांगले यश मिळाले. ह्या चित्रपटामधील उदित नारायण व साधना सरगमने गायलेले पहला नशा हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले.
या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कारासह दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. हा चित्रपट १९७९ च्या अमेरिकन चित्रपट ब्रेकिंग अवेवर आधारित आहे.
जो जीता वही सिकंदर
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.