पश्चिम बनास नदी

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

पश्चिम बनास नदी

पश्चिम बनास ही पश्चिम भारतातील एक नदी आहे. ही राजस्थान राज्यातील सिरोही जिल्ह्यातील दक्षिण अरावली पर्वतरांगातून उगम पावते. ती दक्षिणेकडे वाहते व तिच्या पश्चिमेकडे माउंट अबू आणि पूर्वेकडे अरवली पर्वतरांगां आहे. वाटेत पश्चिम बनास धरण, स्वरूपगंज आणि अबू रोड शहरामधून ती वाहते. ती गुजरात राज्यातील मैदानी प्रदेशातून दक्षिणेकडे पुढे सरकते व बनासकांठा आणि पाटण जिल्ह्यांमधून वाहते आणि कच्छच्या छोट्या रणात हंगामी पाणथळ जागी वाहते.

पश्चिम बनास नदीचे पाणलोट क्षेत्र अंदाजे १,८७६ चौरस किलोमीटर आहे. नदीची लांबी २६६ किलोमीटर आहे, ज्यापैकी ५० किलोमीटर राजस्थानमध्ये आहे, तर उर्वरित गुजरातमध्ये आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →