बनास नदी ही राजस्थानमध्ये अरवली पर्वतात उगम पावतात. ही चंबळ नदीला मिळते व चंबळ पुढे यमुना नदीला मिळते.
ही नदी राजस्थानातल्या उदयपूर जिल्ह्यातील अरवली पर्वत रांगेच्या खमनौर डोंगरात कुंभलगडजवळ उगम पावून राजस्थानातच संपते. हिची एकूण लांबी ४८० किमी आहे. नाथद्वारा, कंकरोली, राजसामंद व भिलवाडा जिल्ह्यातून वहात वहात ती टोंक, सवाई माधोपूर करून चंबळ नदीला मिळते. बनास म्हणजे बन+आस, म्हणजे वनाची आशा.
बनास नदी (राजस्थान)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.