पशुधन ही एक व्यापक संकल्पना असून, त्यात दूध, मांस किंवा शेतीकामासाठी पाळल्या जाणाऱ्या सर्व प्राण्यांचा (गाय, बैल, म्हैस, शेळी, मेंढी, घोडे, डुक्कर, कोंबडी, इत्यादी) समावेश होतो. पशुधन दूध, मांस, लोकर, चामडे आणि वाहतुकीच्या कामासाठी वापरले जातात. कोण्या एखाद्या संस्थेकडे अथवा व्यक्तीकडे असणाऱ्या पाळीव, दुधाळू पाळीव प्राण्यांना सहसा पशुधन (पशुरूपी धन) असे म्हणतात. पशुधनापासून आर्थिक उत्पन्न मिळविता येते म्हणून हा शब्द योजण्यात आला असावा. सहसा, महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन विभागातर्फे हा शब्द अधिक वापरल्या जातो. पशुधनास अनवधानाने गोवंश, गुरे, ढोरे आणि गुरेढोरे असे पर्यायी शब्द वापरले जातात. गुरेढोरे (गाय, बैल, म्हैस आणि रेडा) प्रामुख्याने दूध आणि शेतीच्या कामासाठी (नांगरणी, गाडी ओढणे) वापरली जातात. गोवंश हा पशुधनास समांतर शब्द नसून, हा एक १४० प्रकारांच्या पशूंचा जीवशास्त्रीय कुळ आहे.
पशुधन ही राष्टीय संपत्ती आहे, पशुधनाची जोपासन ही काळाची गरज आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची शेती ही शास्वत राहिलेली नाही त्यामुळे त्याला पशुधन ही ऐक महत्त्वाचे उत्पादन श्रोत आहे. त्याचप्रमाणे हा व्यवसाय हा नियमितपणे उत्पादन देणारा व्यवसाय आहे.
पशुधन
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.