भूपृष्ठावरील प्रवाहित हवेची ऊर्जा. भूपृष्ठावरील वाऱ्याच्या गतिज ऊर्जेला पवन ऊर्जा म्हणतात. पवन ऊर्जा म्हणजे वायू पासून मिळणारी ऊर्जा आहे. वायू एक नवीकरणीय ऊर्जा स्रोत आहे. पवन ऊर्जा तयार करण्यासाठी पवनचक्कीचा वापर केला जातो. ज्यामुळे वायूतील गतिशील ऊर्जा यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतरीत होते.
पवन ऊर्जा ही अक्षय्य ऊर्जा आहे आणि ती सहजासहजी उपलब्ध करून घेता येते. ही ऊर्जा अत्यंत सुरक्षित आणि किफायतशीर आहे. पवन ऊर्जेमुळे वायू प्रदूषण व जल प्रदूषण होत नाही. पवन ऊर्जेचा विकास काही पाश्चिमात्य देशांमध्ये मोठया प्रमाणात झालेला दिसून येतो. जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, स्पेन, भारत, डेन्मार्क, चीन इत्यादी देशांत पवन ऊर्जेवर विद्युत् निर्मिती करण्यात येत आहे. भारतात तमिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांत पवन ऊर्जा केंद्रे उभारण्यात आली आहेत. भारतात १९८५ मध्ये गुजरातमधील मांडवी येथे व्यापारी तत्त्वावर पवन ऊर्जा केंद्र उभारण्यात आले. हे आशिया खंडातील पहिले पवन ऊर्जा केंद्र आहे.
. जंगली आणि ग्रामीण भागामध्ये उभारणे आवश्यक आहे.यामुळे "ग्रामीण भागाचे औद्योगिकीकरण" होण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होते आणि राहण्याची शक्यता कमी होऊ शकते.
वायू स्थिर आणि मजबूत आहे आणि जमिनीवरील किनाऱ्यावरील शेतात कमी हवामान प्रभाव आहे; परंतु बांधकाम आणि देखभाल खर्च खूपच जास्त आहेत.
वारा हा एक अधूनमधून वाहणारा ऊर्जेचा स्रोत आहे, जो वीज बनवू शकत नाही किंवा मागणीनुसार विजेचे वितरण करता येऊ शकत नाही.
पवन ऊर्जा
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.