परिणीती चोप्रा ( २२ ऑक्टोबर १९८८) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. इंग्लंडच्या मॅंचेस्टर विद्यापीठामधून व्यापार, अर्थ व वाणिज्य अशी तिहेरी पदवी घेतलेल्या परिणीतीने २०११ सालच्या लेडीज vs रिक्की बहल ह्या चित्रपटामध्ये सह-नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी परिणीतीला विशेष उल्लेख हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →परिणीती चोप्रा
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.