परशुराम गोडबोले

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

परशुराम नारायण गोडबोले (१७९९:वाई, महाराष्ट्र - १८७४:पुणे) हे संस्कृत पंडित व मराठी लेखक होते. त्यांचे मूळ गाव रत्‍नागिरी जिल्ह्यातील पावस गोळप हे होते. त्यांचे शिक्षण वाईला झाले. त्यानंतर ते पुण्याला आले व जोगांच्या पेढीवर कारकून म्हणून काम करू लागले. हे काम करीत असतानाच गोडबोले मराठी काव्यांचा भाषादृष्ट्या अभ्यास करीत. तेथेच त्यांचा परिचय कॅप्टन थाॅमस कॅंडी यांच्याशी झाला. इ.स. १८५५ सालीं जेव्हां कॅंडीला मराठी ट्रान्सलेटरचे पद मिळाले तेव्हा त्याने परशुरामतात्यांची नेमणूक आपला खास पंडित म्हणून केली. ह्या जागेवर तात्या अखरेपर्यंत होते.

माधव चंद्रोबांना त्यांचे 'सर्वसंग्रह' नावाचे संपादित ग्रंथ लिहिण्यास परशुराम गोडबोले यांची मदत होत असे.

त्यांना परशुरामतात्या गोडबोले, परशुरामपंत गोडबोले, पंततात्या गोडबोले या नावांनीही ओळखले जायचे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →