रावजीशास्त्री सदाशिवशास्त्री गोडबोले (१८३४ - ८ सप्टेंबर, १९०१) हे मराठी व्याकरणकार, भाषांतरकार, इंग्रजी पुस्तकांचे अनुवादक व आद्य मराठी समीक्षक होते.
पुण्यातील जुन्या विश्रामबागेतील पाठशाळेत संस्कृत व इंग्रजी भाषांचे अध्ययन केल्यावर रावजीशास्त्रींनी काही काळ इंग्रजी साहेबांना मराठी शिकवण्याचे काम केले. ब्रिटिश भारतात मराठी भाषाभिज्ञ म्हणून त्यांचा नाव लौकिक होऊन अनेक वर्ष ते दक्षिणा प्राईज कमिटीचे कार्यवाह होते. त्यानंतर शाळा खात्यात ट्रान्सलेटर म्हणून काही काळ काम केल्यावर त्यांनी शालेय पुस्तके तपासून घेणे. नवी पुस्तके काढणे, छापणे आदी कामे केली. या कामाचाच एक भाग म्हणजे परभाषेतील पुस्तके अनुवादित करणे होते.
रावजीशास्त्री सदाशिवशास्त्री गोडबोले
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.