परतूर

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

परतूर

परतूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्याचा एक तालुका आहे. परतूर हे शहरच या तालुक्याचे मुख्य ठिकाण असून ते दुधना नदीच्या काठी आहे. या शहरात शेती संशोधन केंद्र आहे. परतूर हे काचीगुडा-मनमाड लोहमार्गावरील रेल्वे स्थानक आहे.

परतूर गावाचे प्राचीन नाव प्रल्हादपूर आहे, साहजिकच येथे देशपांडे गल्लीत नृसिंह मंदिर आहे. मंदिराजवळ करक्षेत्र कुंड आहे. हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर याच कुंडात नृसिंहाने आपले हात धुतले अशी आख्यायिका आहे. १९३७ साली निजाम प्रांतीय मराठी साहित्य परिषदेची स्थापना झाली. त्या परिषदेचे पहिले अधिवेशन १ ते ३ ऑक्टोबर १९३७ या कालावधीत हैदराबाद येथे भरले होते. या अधिवेशनानंतर मराठवाड्याच्या स्वातंत्र्य चळवळीस चालना मिळाली. जालना जिल्ह्यातील दोन पैकी एक उपविभागीय कार्यालय परतूर येथे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →