पद्मावत हा संजय लीला भन्साळी ह्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. ह्या चित्रपटात दीपिका पदुकोण, शाहीद कपूर, रणवीर सिंग व अदिती राव हैदरी ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सदर चित्रपट हा मलिक मोहोम्मद जायसी ह्यांच्या पद्मावत ह्या काव्यावर आधारित असल्याचे म्हणण्यात आले आहे. प्रदर्शित होण्याआधीपासूनच ह्या चित्रपटाविषयी विविध वाद निर्माण झाले. सुरुवातीला चित्रपटाचे नाव पद्मावती असे ठेवण्यात आले होते, परंतु भारतीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने ते नाव बदलून 'पद्मावत' करण्याची आज्ञा केली. या चित्रपटात दिपिका पदुकोण राणी पद्मिनीची भूमिका सादर करत असून, महाराज रतनसिंह यांची भूमिका शाहीद कपूर आणि सुल्तान अलाउद्दीन खिलजी रणवीर सिंग ह्यांनी सादर केला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पद्मावत
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!